esakal | काश्मीरमध्ये भाजप नेत्याचे अपहरण...
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader mehraj din malla abducted at kashmir

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण केले आहे. मेहराजुद्दीन मल्ला हे सोपोरमध्ये म्युनिसिपल कमेटीचे उपाध्यक्ष आहेत.

काश्मीरमध्ये भाजप नेत्याचे अपहरण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचे अपहरण केले आहे. मेहराजुद्दीन मल्ला हे सोपोरमध्ये म्युनिसिपल कमेटीचे उपाध्यक्ष आहेत.

मेहराजुद्दीन मल्ला याचे मंगळवारी (ता. 14) रात्री उपहरण करण्यात आले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष शेख वसीम बारी यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे वडील आणि भावाचा मृत्यू झाला होता. भाजप नेते मंनझूर अहमद भट्ट यांनी महत्त्वाच्या भाजप नेत्यांना सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात लष्कराच्या ऑलआऊट ऑपरेशनमुळे दहशतीत असलेले दहशतवादी आता अपहरण करत आहेत.

Video: कोरोना काळात माणुसकीचं असंही दर्शन...

loading image