
BJP Leader Pitabash Panda Shot Dead by Unidentified Men Near His Home in Odisha
Esakal
ओडिशात भाजपच्या स्थानिक नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. पीताबाश पांडा असं नेत्याचं नाव आहे. ते भाजपचे सदस्य आणि वरिष्ठ वकील होते. अज्ञातांनी घराजवळच त्यांची हत्या केली. राज्य बार काउन्सिलचे सदस्य आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. घटनास्थळासह शहरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी टीम तयार केल्या असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.