भाजप नेत्याने पक्षाच्या ग्रुपवर पाठवले पॉर्न व्हिडिओ

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एकामागोमाग एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ग्रुपवर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर महिला सभासद तत्काळ ग्रुपमधून बाहेर पडल्या.

अहमदाबाद (गुजरात) : भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एकामागोमाग एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ग्रुपवर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर महिला सभासद तत्काळ ग्रुपमधून बाहेर पडल्या.

गौतम पटेल असे या नेत्याचे नाव असून, ते भाजपच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. पक्षाचा 'नरोदा 12 (मोदी फिर से)' असे व्हॉट्सऍप ग्रुपचे नाव आहे. या ग्रुपमध्ये 20 महिला सभासद आहेत.

गौतम पटेल यांनी या ग्रुपवर एका पाठोपाठ एक असे 70 हून अधिक पॉर्न व्हिडिओ अपलोड केले. ग्रुपवर पॉर्न व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. शिवाय, काही पदाधिकारी सुद्धा ग्रुपमधून बाहेर पडले. काही वेळातच या ग्रुपची चर्चा रंगू लागली. भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकराची भाजप शहर अध्यक्ष जगदीश पांचाळ आणि अहमदाबाद जिल्ह्याचे प्रमुख आय. के. जाडेजा यांच्याकडे तक्रार केली.

पांचाळ म्हणाले, 'पक्षाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पटेल यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.' गौतम पटेल म्हणाले, 'माझा फोन हरवला असून, अज्ञात व्यक्तींने माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या ग्रुपमध्ये अश्लिल व्हिडिओ अपलोड केले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader posts porn videos bjp whatsapp group at gujrat