esakal | 'त्यांना' छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; भाजपचा दिल्लीतून टोला
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader ravishankar prasad press conference after maharashtra government formation

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकवून न शकलेल्यांना आपण काय बोलणार?  : रविशंकर प्रसाद

'त्यांना' छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; भाजपचा दिल्लीतून टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आमच्यासोबत आले तर, लोकशाहीची हत्या. पण, राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करत असले तर ती लोकशाहीची हत्या नाही? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

क्लिक करा आणि सकाळचे एप डाऊनलोड करा

काय म्हणाले रविशंकर प्रसाद?
रविशंकर प्रसाद म्हणाले, 'निवडणुकीत जनतेनं महायुतीच्या बाजूनं बहुमत दिलं होतं. त्यानंतरही शरद पवार यांनी आम्ही विरोधात बसणार, आम्हाला विरोधात बसण्याचा कौल आहे, असं वारंवार सांगितलं होतं. पण, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकवून न शकलेल्यांना आपण काय बोलणार? मागच्या दाराने येऊन शिवसेना आणि काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एक प्रामाणिक आणि स्थिर सरकार देतील. आम्ही बहुमत सिद्ध करू, असा आम्हाला विश्वास आहे. शिवसेनेने युतीत राहून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. ती आम्ही सहन केली आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नवा घेण्याचा आता अधिकार नाही. कारण, सत्तेसाठी त्यांनी 30 वर्षांच्या मैत्रीला लाथ मारली. राष्ट्रवाद, हिंदुत्वाच्या विचारांना सोडून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चोर दरवाज्यानं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.'

आणखी वाचा : ताज्या बातम्या  मुख्य बातम्या

काँग्रेस आणि शिवसेना सगळं विसरून एकत्र येत असली तर तो लोकशाहीचा सन्मान आणि आम्ही स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर, ती लोकशाहीची हत्या कशी होऊ शकते, असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यामुळं ते जो निर्णय घेतील तर, राष्ट्रवादीचा निर्णय असले, असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलंय. 

काय म्हणाले रविशंकर प्रसाद?

  • राष्ट्रवादीच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही 
  • शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर चालते 
  • इतर कोणाचाही सत्ता स्थापनेचा दाव नसल्यामुळं; राज्यपालांनी योग्य तेच केले