esakal | 'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

mamta-banerjee

पश्चिम बंगालचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार अनुपम हाजरा यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मला कोरोनाची लागण झाली तर मी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) हाजरा यांच्यावर निशाणा साधला होता. आता हाजरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता पॉझिटिव्ह

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता - पश्चिम बंगालचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार अनुपम हाजरा यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मला कोरोनाची लागण झाली तर मी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) हाजरा यांच्यावर निशाणा साधला होता. आता हाजरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनुपम हाजरा यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ; हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया

अनुपम हाजरा हे राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यासाठी 24 परगणा येथील बरईपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर मला कोरोना झाला तर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे जाईन आणि त्यांना मिठी मारेन. त्यावेळी त्यांना कोरोनामुळे ज्यांनी आपली जवळची माणसं गमावलीत त्यांचे दुःख समजेल.

मोदींनी केला काँग्रेस नेत्याला फोन अन् म्हणाले…

हाजरा यांच्या या वक्तव्यानंतर टीएमसीने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. जर हे वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणासाचे असेल तर लोक समजू शकतील की या पक्षाचे इतर सदस्य कोणत्या पद्धतीने बोलत असतील, असे टीएमसीने म्हटले होते. टीएमसीने हाजरा यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. 

अनुपम हाजरा हे बोलपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर निवडून आले होते. पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. भाजपने मार्च 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जादवपूरमधून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.

Edited By - Prashant Patil