esakal | मोदींनी केला काँग्रेस नेत्याला फोन अन् म्हणाले…
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

कोरोनाची लागण झाल्यानंतर 100 दिवसांपैकी ५१ दिवस व्हेंटिलेटरवर काढणारे काँग्रेस नेते भरत सिंह सोळंकी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केली.

मोदींनी केला काँग्रेस नेत्याला फोन अन् म्हणाले…

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोनाची लागण झाल्यानंतर 100 दिवसांपैकी ५१ दिवस व्हेंटिलेटरवर काढणारे काँग्रेस नेते भरत सिंह सोळंकी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केली.

व्हेंटिलेटरवर 51 दिवस काढणाऱया नेत्याने कोरोनाला हरवले!

नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विट करत आपण भरत सिंह सोळंकी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. मोदींनी सांगितले की, 'भरत सोळंकी यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. करोनाविरोधातील १०० दिवसांच्या लढाईदरम्यान त्याने उल्लेखनीय धैर्य दाखवले. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.'

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भरत सिंह सोळंकी तब्बल 100 दिवस करोनाशी लढा देत होते. 100 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर भरत सिंह सोळंकी यांना डिस्चार्ज देण्यात आला. जून महिन्यात भरत सिंह सोळंकी यांना करोनाची बाधा झाली होती. पण त्यानंतर त्यांनी धैर्याने कोरोनाचा सामना केला आणि अखेर त्यावर मात केली. भरत सिंह सोळंकी यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन त्यांची विचारपूस केली. रुग्णालयातून निघताना भरत सिंह सोळंकी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे आभार मानले.

एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; त्याची काय चूक...

दरम्यान, भरतसिंग सोलंकी यांना २२ जून रोजी ताप आला होता. शिवाय, घशात दुखण्याच्या तक्रारीनंतर वडोदरा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदाबादच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते तब्बल ५१ दिवस व्हेंटिलेटरवर होते. कोरोनामुळे मूत्रपिंडाचा आणि यकृताचा आजार झाला आहे. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 100 दिवस लागले आणि आता बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

loading image