Viral Video: निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याला अखेर अटक; पाहा व्हिडिओ

Slapping Tripura Polling Official : मतदान केंद्रातील एका निवडणूक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी त्रिपुरातील भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.
 Tripura Polling Official
Tripura Polling Official

गुवाहाटी- त्रिपुरामध्ये लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यावेळी मतदान केंद्रातील एका निवडणूक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी त्रिपुरातील भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यामध्ये काही व्यक्ती अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत होतं.

भाजपचे उत्तर त्रिपुरा जिल्ह्याचे अध्यक्ष काजल दास यांनी निवडणूक अधिकाऱ्याला चापट मारल्याचं आणि धक्काबुक्की केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, काजल दास यांना अटक करण्यात आली आहे. (Slapping Tripura Polling Official)

 Tripura Polling Official
Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

भाजप नेत्यासह इतर काही लोकांनी देखील निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरु आहे. बागबासा विधानभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २२वर अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. याप्रकरणानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काजल दास यांच्या विरोधात धर्मनगरच्या सहायक रिटर्निंग अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काजल दास यांना अटक करण्यात आली. मायक्रो पर्यवेक्षकाची रिपोर्ट आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास केला गेला असं कदमतला पोलीस स्टेशनचे प्रभारी जयंत देबनाथ यांनी सांगितलं.

 Tripura Polling Official
Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

लोक प्रतिनिधित्व अधिनियम कलम ३५३, ३३२ आणि १३१ याच्यासह आयपीसीच्या कलम ३४ अंतर्गत काजल दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ प्राप्त झाला असून त्यात काजल दास यांनी मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती देबनाथ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com