Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Pakistan Judge Kidnapped Viral Video: न्यायाधीश कैदेत असताना त्यांचा एक व्हि़डिओ व्हायरल झाला होता. न्यायाधीशांनी म्हटले होते की, “तालिबानने मला येथे आणले. हे जंगल आहे आणि येथे युद्ध चालू आहे."
Pakistan Judge Kidnapped|Khyber Pakhtunkhwa
Pakistan Judge Kidnapped|Khyber PakhtunkhwaEsakal

पाकिस्तानमध्ये कायम अशांत असलेल्या खैबर पख्तूनख्वा भागात सशस्त्र लोकांनी हल्ला करत एका वरिष्ठ न्यायाधीशाचे 27 एप्रिल रोडी अपहरण केले होते. मात्र, आता त्यांची सुखरूप सुटका केल्याची माहीती पोलिसांनी दिली.

दरम्यान गेल्या वर्षभरापासून पाकिस्तान गृहकलह आणि अर्थिक संकटांशी झुंजत आहे. यासबरोबर पाकिस्तानला दहशतवादाचाही सामना करावा लागत आहे. या सर्वांमध्ये अशा घटना सारख्याच घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Khyber Pakhtunkhwa Judge Kidnapped)

पोलीस अधिकारी फहीम खान यांनी सांगितले की, मोटारसायकलवरील सुमारे 15 जणांनी न्यायाधीश शाकिरुल्ला मारवत यांचे वाहन खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्याकडे जात असताना त्यांनी अडवले व त्यांना ताब्यात घेतले. न्यायाधीशांना सोबत घेऊन पळून जाण्यापूर्वी हल्लेखोरांनी त्यांची कार पेटवून दिली. दरम्यान, यामध्ये चालकाला कोणतीही इजा झाली नव्हती.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारच्या प्रवक्त्याने सोमवारी सकाळी माहिती दिली की, अशांत प्रदेशात सशस्त्र लोकांनी अपहरण केलेल्या न्यायाधीशाची कैदेतून सुटका करण्यात आली आहे.

प्रवक्त्याने पुढे सांगितले की, न्यायाधीशांची तुरुंगातून बिनशर्त सुटका झाली असून ते सुखरूप घरी पोहोचले आहेत. सुरक्षा दलांच्या सहकार्याने सरकार दहशतवादाविरुद्ध यशस्वीपणे लढत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

न्यायाधीशांचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, हे न्यायाधीश कैदेत असताना अज्ञात ठिकाणाहून त्यांचा एक व्हि़डिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये न्यायाधीशांनी सांगितले की, “तालिबानने मला येथे आणले. हे जंगल आहे आणि युद्ध चालू आहे."

काही मिनिटांच्या संदेशात सत्र न्यायाधीश म्हणाले की, "अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्या तरच त्यांची सुटका शक्य आहे. मी फेडरल आणि प्रांतीय सरकारांना, पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, त्यांनी तालिबानच्या मागण्या मान्य कराव्या आणि माझी लवकरात लवकर सुटका होईल याची खात्री करावी.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com