भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

टीम ई सकाळ
Tuesday, 11 August 2020

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे.

लखनौ : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची (BJP) एकहाती सत्ता असून राज्य गुन्हेगारी मुक्त करण्याकडे भाजपचा कल आहे. मात्र, दुसरीकडे भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांवर होणाऱ्या हल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर (Sanjay Khokhar) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोकर हे सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर आवाज ऐकून काही लोक शेताकडे गेले असता तोपर्यंत गुन्हेगारांनी तेथून पळ काढला होता आणि खोकर यांचा मृत्यू झाला होता. बागपत जिल्ह्यातील नेत्यांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना नसून याआधी राष्ट्रीय लोकशाही दलाचे नेते देखपाल खोकर (Dekhpal Khokar) यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader shot dead in Baghpat