
उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला, असे संभाजीराजे यांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उत्तर दिले असून कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळाले आहे.
उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा
पुणे : उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला, असे संभाजीराजे यांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उत्तर दिले असून कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. यावरून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला, असा प्रश्न त्यांनी केला होता, याला उत्तर म्हणून कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांनी उत्तर देताना उद्धव जी त्या संजय राउतांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दात छत्रपती संभाजी यांनी ट्विट केले आहे.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक
छत्रपती संभाजी यांच्या ट्विटला उत्तर देताना संजय राऊत यांनी मा.छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र अशा आशयाचे ट्विट केले आहे. यावरून संजय राऊत आणि छत्रपती संभाजी यांच्यात चांगलेच ट्विटरयुद्ध रंगलेले पाहायला मिळाले.
पहिल्या दिवशी तान्हाजीपेक्षा 'या' चित्रपटाने केली तिप्पट कमाई
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नसल्याचे छत्रपती संभाजी यांनी म्हटले आहे. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशाराही छत्रपती संभाजी यांनी दिला आहे.
Web Title: Twitter War Between Sanjay Raut And Chhatrapati Sambhaji Raje Over Aaj Ke Shivaji Narendra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..