चाकूच्या हल्ल्यात भाजप नेत्याच्या मुलाची हत्या, अनेक जण जखमी | BJP And Indore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

चाकूच्या हल्ल्यात भाजप नेत्याच्या मुलाची हत्या, अनेक जण जखमी

इंदूर : किरकोळ वादातून भाजप (BJP) नेत्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. सुजीत चौहान असे हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर (Indore) जिल्ह्यामध्ये घडली आहे. सदरील भाजप नेत्याचे नाव उदयसिंह चौहान असे आहे. घटनेनंतर नागरिकांनी गोंधळ घालून आरोपींची वाहने पेटवून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि अपर जिल्हाधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. (BJP Leader Son Killed In Indore, Many Injured)

हेही वाचा: मुलीचा मृतदेह पाहाताच आईने फोडला हंबरडा; दोन महिलांचा...

त्यांनी गोंधळ घालणाऱ्या नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर ते शांत झाले. पोलिसांनी सांगितले, की पिगडंबर येथील राजा वर्मा यांच्या प्लाॅटवर बोअर घेण्याचे काम सुरु होते. यावेळी माती-धूळ उडत असल्याने काहींनी ते बंद करण्यास सांगितले. त्यावरुन वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने वार केले. यात भाजप नेते उदयसिंह चौहान यांचा मुलगा सुजीतला चाकू लागला व यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेतायत.

Web Title: Bjp Leader Son Killed In Indore Many Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya PradeshBjp