भाजप नेत्याची पोलिसांना धमकी; ‘केंद्रात व राज्यात सरकार आहे...’

हा व्हिडिओ ट्विट करताना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी आक्षेप घेतला
BJP
BJPsakal

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमधील भाजप नेत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजप नेता उपस्थित पोलिसांना धमकावत (BJP leader threatens police) असल्याचे दिसत आहे. धमकी देताना ‘केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार चालवत असल्याचे सांगत आहेत. फूक मारली तर उडून जाल.’ असे म्हणत आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विट करून आक्षेप घेतला आहे.

भोपाळमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावर कार्यक्रम सुरू होता. यावेळी नेताजींच्या (subhash chandra bose) पुतळ्यावर भाजपचा झेंडाही लावला. तेथे उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी हा झेंडा हटवण्याचा प्रयत्न केला असता भाजप (BJP) नेत्यांनी नकार दिला. त्यानंतरच भाजप नेत्याने हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी आक्षेप घेतला.

BJP
‘असा झाला तथाकथित गावगुंड मोदी तयार’

भोपाळमधील नेताजी सुभाषचंद्र बोस (subhash chandra bose) यांच्या पुतळ्यावरील भाजपचे (BJP) झेंडे हटवण्यावरून वाद झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. यादरम्यान भाजपचे नेते उघडपणे सपशेल जनतेला धमक्या (BJP leader threatens police) देत आहेत, ‘केंद्रापासून राज्यात भाजपचे सरकार आहे, फूक मारली तर उडून जाल’ असे म्हणत आहे. पुढे सलुजाने लिहिले की भाजपच्या राज्य प्रभारींनी आधीच बनिया-ब्राह्मण त्यांच्या खिशात असल्याचे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com