‘असा झाला तथाकथित गावगुंड मोदी तयार’

खासदार सुनील मेंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली
MP Sunil Mendhe
MP Sunil MendheMP Sunil Mendhe

नागपूर : काँग्रेस समर्थीत वकील सतीश उके यांनी शुक्रवारी (ता. २१) तथाकथित गावगुंड मोदीला (उमेश घरडे ऊर्फ मोदी) नागपुरात पत्रकारांसमोर आणले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मोदीला चांगलाच घाम फुटला होता. यावरूनच या मोदीचा जन्म कसा झाला हे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत सांगितले.

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारूही शकतो’ असे वक्तव्य करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देशभर खळबळ उडवून दिली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलीच चर्चा सुरू झाली होती. यातून सावरासवर करीत ‘मी गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो, तुम्ही कोणत्या मोदीबद्दल बोलत आहात?’ असा प्रश्नच नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

MP Sunil Mendhe
पोलिस निरीक्षक कॉन्स्टेबलला म्हणाला; मला तू खूप आवडते, फक्त...

भाजपने आंदोलन करीत नाना पटोलेच्या (Nana Patole) वक्तव्याचा निषेध केला होता. वाढता विरोध पाहता काँग्रेस समर्थीत वकील सतीश उके यांनी शुक्रवारी (ता. २१) तथाकथित गावगुंड मोदीला नागपुरात पत्रकारांसमोर आणले. भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्याने नाना पटोले यांच्याविरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा (BJP) ॲड. सतीश उके यांनी केला होता.

यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषद घेतली. कॉंग्रेस हायकमांडने नानांना (Nana Patole) झापल्याची माहिती मला मिळाली. आपली बाजू सावरण्यासाठी त्यांनी खरोखरच मोदी नावाचा गुंड तयार केला आणि एका वकिलाच्या मार्फत पत्रकारांसमोर उभे केले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दिशाभूल करण्यासाठी नानांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही खासदार मेंढे म्हणाले.

MP Sunil Mendhe
डान्सच्या नावावर तरुणींचा ‘विवस्त्र डान्स’; १०० रुपये तिकीट

मग तो गुंड कसा?

मोदीवर पूर्वी व आता कोणतेही गुन्हे दाखल नाही. मग तो गुंड कसा, असा सवाल सुनील मेंढे (Sunil mendhe) यांनी केला आहे. सरकारच्या दबावात भंडारा पोलिस आले आहे. नाना पटोले यांना पोलिस पाठीशी घालत असल्याचे खासदार सुनील मेंढे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com