उद्या कर्नाटक हादरणार? भाजपचा दावा

 उद्या कर्नाटक हादरणार? भाजपचा दावा

बंगळुरू- उद्या कर्नाटक हादरणार असल्याचा दावा भाजपने केला असून कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप पुन्हा एकदा सज्ज झालं असून भाजप कर्नाटकात सत्तापालट करणार दावा भाजपने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे तीन नाराज आमदार भाजपसोबत आहेत. 

काँग्रेसच्या त्या तीन आमदारांना घेऊन महाराष्ट्रातले भाजपचे प्रभारी मंत्री व्ही. सतीश मुंबईत पोहोचले असल्याची चर्चा आहे. उरलेले चार संध्याकाळपर्यंत मुंबईत पोचतील असं सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील एका भाजप नेत्याने सांगितले की 'आमच्या हाय कमांडला वाटतं लोकसभेची निवडणूक काँग्रेस-जेडीएस यांनी एकत्र होऊन लढवली, तर भाजपसाठी कठीण जाईल. कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे. हे जेव्हा शक्य होईल, तेव्हा तिथे आपलं सरकार असेल.

काँग्रेसचे ट्रबल शूटर डी.के. शिवकुमार यांनी रविवारी (13 जानेवारी )ला म्हटलं होतं, राज्यातल्या सरकारला पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. शिवकुमार यांनी सांगितलं होते की, 'राज्यात विधेयकांची खरेदी सुरू आहे. आमचे तीन आमदार भाजपच्या काही आमदारांबरोबर आणि नेत्यांबरोबर मुंबईच्या एका हॉटेलमध्ये उतरलेत. तिथे काय झालंय, कुणाला किती रक्कम देऊ केलीय, हे आम्हाला माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com