बंदूक साफ करताना सुटली गोळी: भाजप नेत्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
Monday, 15 June 2020

भारतीय जनता पक्षाचा एक नेता बंदूक साफ करत होते. पण, अचानक गोळी सुटल्याने ती छातीत घुसली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेंद्र मिश्रा असे त्यांचे नाव आहे.

ग्वालियर (मध्य प्रदेश): भारतीय जनता पक्षाचा एक नेता बंदूक साफ करत होते. पण, अचानक गोळी सुटल्याने ती छातीत घुसली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेंद्र मिश्रा असे त्यांचे नाव आहे.

डोळ्यात पाणी आणणारा मैत्रिचा व्हिडिओ व्हायरल...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुरेंद्र मिश्रा यांना एका विवाहासाठी जायचे होते. विवाहाला जाण्यापूर्वी ते रायफल साफ करत होते. पण, साफ करताना अचानक गोळी सुटली आणि छातीत घुसली. गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडे धाव घेतली. छातीत गोळी घुसल्याचे पाहून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोरोनामुळे कोथिंबीर धुतली साबणाने; व्हिडिओ व्हायरल...

कुटुंबियांनी सांगितले की, सुरेंद्र हे घराच्या पहिल्या मजल्यावर परवाना असलेली रायफल साफ करत होते. पण, त्यांना रायफल लोड असल्याची कल्पना नव्हती. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर मुलगा आणि पत्नी पहिल्या मजल्यावर पोहचले. यावेळी ते जखमी अवस्थेत होते. तीन तासांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महाराजपुरा पोलिसांनी 12 बोअरवेलची रायफल ताब्यात घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leaders clearing guns sudden firing mourning death at madhya pradesh