भाजप नेत्याच्या मुलाने चौघांना चिरडले; दोघांचा मृत्यू

BJP Leaders Son Drunk Runs Over Labourers In Jaipur 2 Dead
BJP Leaders Son Drunk Runs Over Labourers In Jaipur 2 Dead

जयपूर : भाजप नेत्याच्या मुलाने पदपथावर मोटार घालून चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानातील जयपूरमधील गांधीनगर भागात ही घटना घडली आहे. ही घटना काल (गुरुवारी) रात्री उशिरा घडली आहे. 

आरोपीला जेव्हा पोलिस स्थानकामध्ये हजर करण्यात आले, त्यावेळी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीने अतिप्रमाणात मद्य सेवन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने त्या मद्याच्या नशेत स्कॉर्पिओ मोटार ही वेगाने पदपथावर घातली, त्यामध्ये पदपथावर असलेले चार जण मोटारीखाली चिरडले गेले.

आरोपीवर भारतीय कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज आरोपीला न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. आरोपी हा एका पेट्रोल पंपाचा संचालक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com