राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश सिंह यांची निवड

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह यांची आज (गुरुवार) निवड झाली. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं तर हरिप्रसाद 105 मतं मिळाली.

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह यांची आज (गुरुवार) निवड झाली. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं तर हरिप्रसाद 105 मतं मिळाली.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एकूण 222 खासदारांनी मतदान केले. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश सिंह विजयी झाल्याची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिवंश यांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी दोनवेळा मतदान झाले. पहिल्या मतदानात हरिवंश यांना 115 मते मिळाली. पहिल्या मतदानावेळी काही मतांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान घेण्यात आले. यात हरिवंश यांना 122 मतं मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आवाहन केल्याने ओडिशातील बिजू जनता दल, तमिळनाडूतील अण्णा द्रमुक, तेलंगणातील टीआरएस या पक्षांनी हरिवंश यांना मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या आशा-अपेक्षांना सुरुंग लागला.

खासदारांवर आता राहिल हरीकृपा: नरेंद्र मोदी
राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह झाल्यानंतर सगळ्या खासदारांवर आता हरीकृपा राहिल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन्हीकडे हरी होते. मात्र हरिवंश नारायण यांचा विजय झाला याचा मनस्वी आनंद झाला, असेही मोदी यांनी म्हटले आहे. हरिवंश यांनी आपल्या वृत्तपत्रतात संसद कशी चालवावी याचा स्तंभ चालवला होता. त्यामुळे त्यांना संसद कशी चालवायची हे माहित आहे. दशरथ मांझी यांची बातमी शोधून काढणारे ते पत्रकार आहेत. ते राज्यसभेच्या उपसभापतीपदी बसल्याने त्यांच्या अनुभवाचा सगळ्यांनाच फायदा होईल यात शंका नाही, असेही मोदी यांनी म्हणाले.

Web Title: BJP led NDA candidate Harivansh Narayan Singh elected new Rajya sabha deputy chairman