भाजप नेते म्हणतात, देशात राहायचे असेल तर आमचे ऐकावेच लागेल 

वृत्तसंस्था
Saturday, 4 January 2020

देशाच्या सुरक्षेसाठी सुधारित नागरिकत्व कायदा अंमलात आणण्यात आला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कायद्याच्या विरोधात बळ्ळारीत पुन्हा आंदोलन किंवा फेरी काढल्यास आपण गप्प बसणार नाही.

बंगळूर : "आमच्या देशात राहायचे असेल तर आमचे ऐकावे लागेल; अन्यथा परिस्थिती वेगळी होईल. हिंदूंना डिवचू नका. देशातून हाकलून देण्याची भीती असल्यास देश सोडून जा', असे वादग्रस्त विधान बळ्ळारीचे भाजप नेते सोमशेखर रेड्डी यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी (ता. 3) बळ्ळारी शहरात फेरी काढण्यात आली. या फेरीला संबोधित करताना त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले. 
रेड्डी म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी सुधारित नागरिकत्व कायदा अंमलात आणण्यात आला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कायद्याच्या विरोधात बळ्ळारीत पुन्हा आंदोलन किंवा फेरी काढल्यास आपण गप्प बसणार नाही. आजच्या फेरीत केवळ पाच टक्के लोक आले आहेत. जास्त नाटक केल्यास उर्वरित 95 टक्के लोकही रस्त्यावर उतरतील. त्या वेळी कायद्याला विरोध करणारे कुणीच शिल्लक राहणार नाही. 

सोन्याने घेतली तब्बल 752 रुपयांची उसळी

कोणीही आमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये. पोलिसांवर हल्ले केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. कॉंग्रेसचे नेते खोटे बोलून दंगे घडवत आहेत. पाकिस्तानात जायची इच्छा असलेल्यांनी तिथे खुशाल निघून जावे. देशात सर्व जण बंधूप्रमाणे आहोत. शत्रूप्रमाणे वागल्यास आमचे उग्र रूप दाखवावे लागेल. मी देशभक्त असून मेल्यानंतरही माझे प्रेत "भारतमाता की जय' म्हणेल, असे वादग्रस्त वक्‍तव्यही रेड्डी यांनी या वेळी केले. सोमशेखर रेड्डी बळ्ळारीचे खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डींचे बंधू आहेत. ते आधी बळ्ळारीचे आमदारही होते. तसेच कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP legislator G Somashekar Reddy termed himself as terrific patriot