मोदी-शहांचा सत्तास्थापनेचा डाव अपयशी ठरला : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
Thursday, 28 November 2019

महाराष्ट्रात आज होणाऱ्या शपथविधीला जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही. मोदी-शहांचा महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा डाव अपयशी ठरल्याने आपलं भविष्य उज्ज्वल आहे. भाजपने महाराष्ट्रात लाजीरवाणा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर महाराष्ट्रातील सत्ताघडामोडींवरून जोरदार टीका करत मोदी-शहांचा सत्तास्थापनेचा डाव अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात आज (गुरुवार) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. भाजपने अजित पवारांच्या साथीने सत्तास्थापनेचा प्रयत्न केला. पण तो पूर्ण अपयशी ठरविण्यात या तिन्ही पक्षांना यश आले होते. यावरून भाजपची देशभरात नाचक्की झाली आहे. मोदी-शहा यांचा सत्तास्थापनेचा डाव महाराष्ट्रात पूर्णपणे उलटला आहे. आज काँग्रेसच्या संसदीय समितीच्या झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी-शहांवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

सोनिया गांधी म्हणाल्या, की महाराष्ट्रात आज होणाऱ्या शपथविधीला जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही. मोदी-शहांचा महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा डाव अपयशी ठरल्याने आपलं भविष्य उज्ज्वल आहे. भाजपने महाराष्ट्रात लाजीरवाणा प्रयत्न केला. फायद्यात असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आपल्या मित्रांना नरेंद्र मोदी विकत आहेत. नरेंद्र मोदी सरकार आपल्या मूलभूत हक्कांवरही मर्यादा आणत आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP made shameless efforts in Maharashtra Says Sonia Gandhi