Loksabha 2019 : भाजप म्हणजे 'बहुत जूतिया पार्टी'

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

'ते तुम्हाला शराबी समजतील. तुम्हाला भेसळ म्हणतील तर मी सुद्धा त्यांच्यासाठी एक नाव शोधले आहे. ते बुटाने (जूते) मारहाण करतात. मी तर शिव्या देऊ शकत नाही. हे मोठे जूतिए आहेत. त्यामुळे ही 'बहुत जूतिया पार्टी' आहे.'

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) म्हणजे 'बहुत जूतिया पार्टी', असे राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वादात आता राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी उडी घेतली आहे. जयंत चौधरी एका रॅलीत बोलताना म्हणाले, 'ते तुम्हाला शराबी समजतील. तुम्हाला भेसळ म्हणतील तर मी सुद्धा त्यांच्यासाठी एक नाव शोधले आहे. ते बुटाने (जूते) मारहाण करतात. मी तर शिव्या देऊ शकत नाही. हे मोठे जूतिए आहेत. त्यामुळे ही 'बहुत जूतिया पार्टी' आहे.'

'आप'चे नेते संजय सिंह यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते की, 'मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते.'

दरम्यान, मोदी यांनी मेरठ येथे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी मोदींनी विरोधकांचा समाचार घेताना समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आद्याक्षरांचा वापर करत हे पक्ष उत्तर प्रदेशसाठी 'सराब' असल्याचे म्हटले होते. ही 'सराब' उत्तर प्रदेशसाठीच नव्हे, तर देशासाठीही घातकच आहे.

Web Title: bjp mean bahut jutiya party says rld leader jayant chaudhary