खासदारांनी योजनांचा आपल्या भागात जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा - नरेंद्र मोदी

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात भाजप संसदीय बैठक पार पडली
 Narendra Modi
Narendra Modisakal

नवी दिल्ली : आगामी पावसाळ्यात जलसंवर्धाच्या मोहीमेत सत्तारूढ भाजप खासदारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे व हर घर जल सारख्या मोदी सरकारच्या १४ ठळक योजनांचा आपापल्या भागात जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या खासदारांना दिला. भाजप संसदीय पक्ष बैठक आज पार पडली. तीत मोदींनी खासदारांना विविध सूचना केल्या. आजच्या बैठकीत भाजप खासदारांना एक गुजरातनिर्मीत किट देण्यात आले. त्यात कमळ चिन्ह असलेली भगवी टोपी व एका बूस्टर चाॅकलेट बारचाही समावेश आहे. नंतर अनेक खासदारांनी ही नवी टोपी मिरविली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात भाजप संसदीय बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा व वरिष्ठ नेत्यांसह भाजप खासदार बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान भाजप वर्धापनदिनी उद्या सारे भाजप कार्यकर्ते आपल्या घरावर, नंतर पक्षकार्यालयात पक्षध्वज फडकावतील असे सांगण्यात आले. सकाळी १० ला पंतप्रधान मोदींचै पक्षाच्या केडरसाठी विशेष संबोधन होईल. त्याचे सामूदायिक श्रवण करून त्यातील आदेशाचे पालन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

अर्थसंकल्पी अधिवेशनातील ही अखेरची भाजप बैठक. त्यामुळे मोदींनी आपल्या खासदारांना आपापल्या मतदारसंघात गेल्यावर केंद्राच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. हर घर जल व हर घर नळ सारख्या योजनांबरोबरच ८ एप्रिलला प्तप्रधान आवास योजनेबाबत तर १० एप्रिलला पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत जागरूकता करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. या जनजागृती मोहीमेचा विस्ताराने कार्यक्रम तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे करा व आपल्या कामाचा अहवाल दिल्लीला केंद्रीय भाजप मुख्यालयाकडे पाठवा असेही खासदारांना बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी पावसाळ्यात पावसाचे पाणी अडविणे व साचविणे यावर भर द्यावा लागेल , जल संरक्षण ही काळाची सर्वांत मोठी गरज आहे असे सांगून मोदी म्हणाले की आपापल्या भागात आहेत त्या जलाशयांची देखभाल-दुरूस्ती व नवीन जलाशयांची निर्मिती यावर भर द्यायचा आहे. अधिवेशन संपल्यावर पुढचे १५ दिवस आपापल्या मतदारसंघांतील जलाशयांकडे खास लक्ष द्या व पावसाळ्यापर्यंत हे जलाशय पूर्ण क्षमतेने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सज्ज होतील याची दक्षता घ्या असेही ते म्हणाले.

भाजपचा स्थापना दिन उद्या (ता. ६ एप्रिल) आहे याची पुन्हा आठवण करून देऊन पंतप्रधान म्हणाले की पक्षाध्यक्षांनी आताच याबाबतचा कार्यक्रम सविस्तरपणे सांगितला आहे. पक्षाचा कार्यकर्ता हा आपला सर्वांत महत्वाचा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीच्या जोरावरच पक्ष विजयामागून विजय मिळवत जातो. भाजप स्थापनादिना निमित्त आपापल्या संसदीय क्षेत्रात विशेष कार्यक्रमांचे आयोजन चोख होईल याची दक्षता प्रत्येक खासदाारने घ्यावी. तुम्ही अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलात तरी मतदारसंघातील आपल्या यंत्रणेला सज्ज करा असे ते म्हणाले.

नड्डा यांनी उद्यापासून सुरू होणाऱया सामाजिक सद्भाव पंधरवड्यात भाजपच्या वतीने देशभरात आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमांची माहिती दिली. हे कार्यक्रम असे

  • ता. ६ एप्रिल - भाजप स्थापनादिन व पंतप्रधानांचे त्यानिमित्त संबोधन.

  • ता. ७ - आयुष्मान भारत योजनेचा प्रसार, जनऔषधी केंद्रांवर कार्यक्रम.

  • ता. ८ - पंतप्रधान आवास योजनेचा प्रसार

  • ता. ९ - हर घर जल, हर घर नल चा प्रसार

  • ता. ११ - सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ उपक्रम

  • ता. १२ कोरोना लसीकरण जनजागृती

  • ता. १३ - पंतप्रधान अन्न योजनेशी संबंधित उपक्रम

  • ता. १४- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com