भाजप आमदार म्हणतात, राहुल गांधी 'गाढवांचे सम्राट'

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 मार्च 2019

राहुल गांधी यांना यापूर्वी 'पप्पू' म्हणून ओळखले जात होते. हे नाव हानीकारक नव्हते पण गोंडस होते. मात्र, आता राहुल गांधी देशविरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत असून, 'पप्पू'वरून त्यांना आजपासून 'गधों का सरताज' म्हणून ओळखले जाईल.  

- आकाश विजयवर्गीय, भाजप आमदार

इंदौर : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना 'गाढवांचे सम्राट' म्हटले आहे. 

आकाश विजयवर्गीय हे मध्य प्रदेशातील इंदौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे ते पुत्र आहेत. राहुल गांधी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांनी मोदींवर गुन्हा दाखल करून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यावर आकाश विजयवर्गीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना हे वक्तव्य केले. 

ते म्हणाले, राहुल गांधी यांना यापूर्वी 'पप्पू' म्हणून ओळखले जात होते. हे नाव हानीकारक नव्हते पण गोंडस होते. मात्र, आता राहुल गांधी देशविरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत असून, 'पप्पू'वरून त्यांना आजपासून 'गधों का सरताज' म्हणून ओळखले जाईल.  
 

Web Title: BJP MLA Akash Vijayvargiya calls Rahul Gandhi Gadhon ka Sartaj