
खतांच्या तुटवड्यावरून भाजप आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. या खडाजंगीनंतर आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. मध्य प्रदेशातील भिंड इथं हा प्रकार घडलाय. तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांचे नाव नरेंद्र सिंह कुशवाह तर जिल्हाधिकाऱ्यांचं नाव संजीव कुमार श्रीवास्तव असं आहे. आमदार कुशवाह यांनी खताच्या तुटवड्यावरून जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला जात आहे.