भाजप आमदार तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात, दमदाटी करणाऱ्यांना लाथा घालण्याचा 'सल्ला'

Solapur : दोन जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप आमदार उपस्थित होते. तडीपार केलेल्या गुंडाची जाहीर कार्यक्रमाला उपस्थिती असल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतोय.
Solapur BJP MLA Attends Gangster Event Opposition Questions Police and Party Stand

Solapur BJP MLA Attends Gangster Event Opposition Questions Police and Party Stand

Esakal

Updated on

एका तडीपार केलेल्या नेत्याच्या कार्यक्रमाला सोलापूरमध्ये भाजप आमदारानं उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. शिवाय त्यांनी भाजपच्याच शहराध्यक्षाला सुनावताना दमदाटी करणाऱ्यांच्या कमरेत लाथा घाला असं भाष्य केलंय. यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com