भाजप आमदाराची पोलिसाला मारहाण, जिवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॉमेरॅत कैद झाली आहेत. 

भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॉमेरॅत कैद झाली आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, "देवडा यांचा पुतण्या रात्री पोलिस ठाण्यात आला होता. त्याने पोलिसांशीवाय कोणालाही परवाणगी नसलेल्या खोलीत जाऊन एका व्यक्तीच्या हातातील पाण्याची बाटली हिसकावून घेतली. त्यावेळी पोलिस ठाण्यात कामावर असलेले पोलिस कॉन्स्टबल संतोष इवंती यांनी देवडा यांच्या पुतण्याला पोलिस ठाण्यात का आला याची विचारणी केली. याचा राग आल्याने पुतण्याने लगेच आमदार देवडा यांना फोन करून बोलावून घतले. त्यानंतर पोलिस ठाण्यात आलेल्या देवडा यांनी पोलिस कॉन्स्टबल संतोष इवंती यांच्या दोन्ही कानशीलात लगावल्या आणि त्यांना मारण्याची धमकी दिली. पोलिस कॉन्स्टबल इवंती हे मागे हाताची घडी घालून शांत उभे होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला."    
 
संतोष यांच्या म्हणण्यानूसार एक व्यक्ती पोलिस ठाण्यात आली. त्याने दुसऱ्याची हातातील पाण्याची बाटली हिसकावली. त्यावेळी संतोष यांनी त्याला थांबवून बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर काही वेळाने देवडा यांचा मुलगा पोलिस ठाण्यात आला. त्याच्यानंतर आलेल्या आमदार देवडा यांनी कॉन्स्टबल इवंती यांना मारहाण करत धमकी दिली. 

पोलिस अधिक्षक अंशुमन सिंह म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी सूरु असून, तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. हा संपुर्ण प्रकार रात्री 12 वाजता झाला आहे. या प्रकरणी कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावताना अडथाळा आणणे) कलम 332 (सरकारी कर्मचाऱ्याला धमकावे, मारहाण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"चम्पालाल देवडा हे अशा प्रकरे वागू शकतात याची कल्पना नव्हती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे." असे मत भाजप प्रवक्ते शंभू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
 

Web Title: BJP MLA Caught On CCTV Slapping Constable, Threatening To Kill Him