दररोज गोमूत्र प्यायल्याने करोना होत नाही; भाजप आमदाराचा दावा, पाहा Video

दररोज गोमूत्र प्यायल्याने करोना होत नाही; भाजप आमदाराचा दावा, पाहा Video

आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असणारे उत्तर प्रदेशमधील बैरियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दररोज गोमूत्र प्यायल्यानं कोरोना होत नसल्याचा दावा सुरेंद्र सिंह यांनी केलाय. त्यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआयनं हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. कोरोना महामारीमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. संशोधक-शास्त्रज्ञ यावरील लस शोधण्यात दिवसरात्र एक करत आहेत. वेगवेगळ्या लसींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवत आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनावर गोमूत्र रामबाण उपाय असल्याचा दावा केलाय. सुरेंद्रसिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

एएनआयनं पोस्ट केलेला व्हिडिओ सुरेंद्र यांनी स्वत: तयार केला आहे. यामध्ये ते म्हणतात, गोमूत्र प्यायल्यानेच करोनाला हरवता येणं शक्य आहे. व्हिडिओत सुरेंद्रसिंह स्वत: गोमूत्र पिताना दिसत आहेत. तसेच, गोमूत्र कसं प्यायला हवं म्हणजो कोरोनाला हरवता येईल. याचे प्रात्यक्षिक हे ते दाखवत आहेत. फक्त कोरोनाच नाही, तर इतरही अनेक आजारांवर गोमूत्र गुणकारी असल्याचं व्हिडिओत ते सांगत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलंदशहरमधील भाजपच्या आणखी एका आमदारानं गोमूत्रबद्दल अशाच प्रकारचा दावा केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशमध्ये आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com