भाजप सोडून ज्येष्ठ नेत्याने स्थापन केला नवा पक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

राजस्थानमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मुलगा अखिलेश तिवारी याच्यासोबत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नवनिर्वाचित पक्षाचे नाव भारत वाहिनी पक्ष असे असेल.​

जयपूर (राजस्थान)- राजस्थानमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मुलगा अखिलेश तिवारी याच्यासोबत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नवनिर्वाचित पक्षाचे नाव भारत वाहिनी पक्ष असे असेल.

राजस्थानातील येणारी विधानसभा निवडणुक हा पक्ष लढणार आहे. अखिलेश तिवारी यांनी यावेळी सांगितले की, 'पक्षाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम तिवारी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या 200 जागा आम्ही लढवणार आहोत. पक्ष आपल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसोबत 3 जुलै रोजी पहिली बैठक घेणार आहे. यामध्ये जवळपास 2000 कार्यकर्ते समाविष्ट होतील. त्याचबरोबर, उमेदवारीसाठी प्रत्येक मतदारसंघातून 10 अर्ज मागवणार आहे. निवडणूक आयोगाने भारत वाहिनी पक्षाला अधिकृत मंजूरी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकीटावर उमेदवार निवडणुक लढवू शकणार आहेत.'

दरम्यान, घनश्याम तिवारी यांनी भाजपमध्ये मोठ्या भूमिका बजावलेल्या आहेत. ते राजस्थानमध्ये सहावेळा विधानसभा सदस्य राहिले आहेत. सध्या ते 2003 पासून सांगानेर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

Web Title: BJP MLA ghanshyam tiwari founded new party