भाजप कार्यालयात होळी खेळताना आमदारावर गोळीबार

BJP MLA from Lakhimpur Yogesh Verma was shot at during holi festival at uttar pradesh
BJP MLA from Lakhimpur Yogesh Verma was shot at during holi festival at uttar pradesh

लखनौ (उत्तर प्रदेश): भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होळी खेळत असताना झालेल्या वादावरून पक्षाचे आमदार योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लखीमपूर येथील भाजप कार्यालयाच्या परिसरामध्ये होळीचा सण मोठ्या उत्सवात सुरू होता. कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यावेळी अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात गोळी योगेश वर्मा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. आमदार वर्मा यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे सांगितले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूर मतदारसंघातून योगेश वर्मा यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. यामधून गोळीबार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विविध शक्यतांचा अंदाज व्यक्त करून पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे वर्मा यांना मानसिक धक्का बसला असून, याबाबत प्रतिक्रिया देण्याची मनस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com