esakal | Video: बंदूक घेऊन नाचणाऱया आमदाराची घरवापसी
sakal

बोलून बातमी शोधा

bjp mla pranav singh champion

उत्तराखंडच्या खानपूरमधील भाजपचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन हे बंदूक हातात घेऊन गाण्यावर नाचले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण, पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे.

Video: बंदूक घेऊन नाचणाऱया आमदाराची घरवापसी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: उत्तराखंडच्या खानपूरमधील भाजपचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन हे बंदूक हातात घेऊन गाण्यावर नाचले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण, पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे.

प्रवासासाठी आता 'ई-पास' आणि क्वारंटाईन पण नाही...

प्रणव सिंह चॅम्पियन यांनी अनेक पिस्तुल आणि बंदुका हातात घेऊन डान्स केला होता. शिवाय, मद्यपान करताना दिसून आले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवर टीका झाली होती. त्यामुळे आमदार चॅम्पियन यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पण, त्यांची घरवापसी झाली आहे. यावेळी आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांनीही उत्तराखंडच्या जनतेची माफी मागितली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांनी आमदार चँपियन यांच्या पक्षात पुन्हा प्रवेशाची घोषणा केली. ते म्हणाले की, 'कोणत्याही भाजप आमदाराला त्याच्या मर्यादा ओलांडण्याची परवानगी नाही. पक्षाचा प्रत्येक आमदार हा जनतेचा सेवक असून, केवळ जनतेच्या सेवेसाठी त्याने काम करावे.'

भाजपमध्ये घरवापसी झाल्यानंतर प्रणवसिंग चॅम्पियन म्हणाले की, मी भाजपमध्ये होतो आणि आहे. जनतेची माफी मागताना म्हणाले की, 'दारु पिणे किंवा शस्त्र परवाना बाळगणं हा काही गुन्हा नाही.' दरम्यान, चॅम्पियन यांनी यापूर्वी एका पत्रकाराला धमकावले होते. त्यावेळीही त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. यामुळे पक्षातून निलंबनाची ही पहिलीच कारवाई नव्हती.

...म्हणून वडिलांनी केली स्कूटरसारखी सायकल

loading image
go to top