प्रवासासाठी आता 'ई-पास' आणि क्वारंटाईन पण नाही...

वृत्तसंस्था
Tuesday, 25 August 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठी निर्बंध घालण्यात आले होते. पण, विविध राज्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत आहे. कर्नाटकमध्ये प्रवासासाठी ई-पास आणि क्वारंटाईनची आवश्यकता नाही.

बंगळुरु : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठी निर्बंध घालण्यात आले होते. पण, विविध राज्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत आहे. कर्नाटकमध्ये प्रवासासाठी ई-पास आणि क्वारंटाईनची आवश्यकता नाही.

...म्हणून वडिलांनी केली स्कूटरसारखी सायकल

कर्नाटकमध्ये लॉकडाऊनच्या पाच महिन्यानंतर प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये ई-पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यक नाही. निर्बंध हटविल्यानंतर राज्य गृह मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जात आहे. सुधारित नियमांनुसार, कर्नाटकात येणाऱ्या लोकांना प्रवेशासाठी सेवा सिंधू पोर्टलवर पास घेण्याची आवश्यकता नाही. कर्नाटकात सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घातली आहे. यामुळे आता कोणत्याही निर्बंधाशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कर्नाटकमध्ये प्रवेश करता येणार आहे.

कोविड सेंटरमध्ये आरोपीची दारू पार्टी; फोटो व्हायरल

कर्नाटकमध्ये आल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसले नाही तर ती व्यक्ती १४ दिवस होम क्वारंटाईन न राहता कामावर जाऊ शकते किंवा बाहेर फिरू शकते. मात्र, त्या व्यक्तीला १४ दिवस स्वत:ला निरीक्षण करावे लागेल. जर लक्षणे दिसली तर त्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेट होऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

कर्नाटकमध्ये नागरिकांना मूलभूत कोविड-१९ चे नियम पाळावे लागणार आहेत. यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, साबण-पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुणे यासारखे नियम पाळावे लागणार आहेत. दरम्यान, कर्नाटकात सोमवारी (ता. 24) दिवसभरात कोरोनाचे ५,८५१ नवे रुग्ण आढळले असून, 130 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या २, ८३, ६६५ इतकी झाली आहे. मात्र, या कालावधीत ८,०१६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ४,८१० लोकांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no epass no quarantine no registering seva sindhu karnataka relaxes travel norms