esakal | ...म्हणून वडिलांनी केली स्कूटरसारखी सायकल
sakal

बोलून बातमी शोधा

student and father made a bicycle that looks like scooter video viral

लॉकडाऊनच्या काळात वडिलांनी वेळेचा उपयोग करत मुलासाठी एक आगळी-वेगळी सायकल तयार केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वडिलांच्या जुगाडाचे कौतुक होत आहे.

...म्हणून वडिलांनी केली स्कूटरसारखी सायकल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लुधियाना (पंजाब) : लॉकडाऊनच्या काळात वडिलांनी वेळेचा उपयोग करत मुलासाठी एक आगळी-वेगळी सायकल तयार केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वडिलांच्या जुगाडाचे कौतुक होत आहे.

Video: पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांसमोर घातल्या 7 गोळ्या

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लखोवल गावात आठवीमध्ये शिक्षण घेणाऱया हरमनजोत या मुलाने वडिलांकडे सायकलची मागणी केली होती. लॉकडानच्या काळात सायकल घेणे शक्य नव्हते. पण, भरपूर वेळ असल्यामुळे वडिलांनी मुलासाठी आगळी-वेगळी सायकल तयार करण्याचे ठरवले. स्कूटर आणि सायकलच्या विविध वस्तूंचा वापर करून सायकल तयार केली. सायकलचा पुढचा लूक स्कूटरसारखा आहे आणि मागे सायकलचे चाक लावण्यात आले आहे. सायकलचे पॅंडल मारून ही चालवायता येते. समोरून स्कूटरसारखी दिसणारी ही सायकल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात आर्थिक नियोजन बिघडले असताना आणि वेळेचा उपयोग करून वडिलांनी आपल्या मुलाच्या मदतीने जुगाड केला. आगळी-वेगळी सायकल तयार करणाऱया वडिलांचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.

Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात

loading image
go to top