भाजप आमदारावर पोलिसांचा लाठीचार्ज; आमदार किरकोळ जखमी

भाजप आमदारावर पोलिसांचा लाठीचार्ज; आमदार किरकोळ जखमी

हैदराबाद : तेलंगणातील भाजप आमदार टी. राजासिंह हे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. राजासिंह हे वीरांगना राणी अवंतीबाई यांचा पुतळा बदलण्यासाठी जात असताना जमावाची अडवणूक करताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये आमदार राजासिंह जखमी झाले असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. 

राजासिंह हे हैदराबादमधील घोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यांच्यावर लाठीचार्ज झाल्याची माहिती त्यांनी फोटोसह आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. याबाबत त्यांनी ट्विट करत सांगितले, की जुम्मेरत बाजार येथील राणी अवंतीबाई यांचा पुतळा मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छ अवस्थेत होता. त्यामुळे त्यांचा पुतळा हटविण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, याचदरम्यान तेलंगणा पोलिसांनी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांकडून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

तसेच पुढे ते म्हणाले, राणी अवंतीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या ठिकाणी असलेला पुतळा बदलण्यासाठी आम्ही गेलो होतो. राणी अवंतीबाई यांचा पुतळा दर 5 वर्षांनी बदलण्यात येतो. असे आम्ही पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यांनी आमचे काहीही न ऐकता आम्हाला तिथे मूर्ती बसवू दिली नाही. याउलट पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे राजासिंह यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com