Yamuna Expressway Accident
esakal
भाजपा आमदार राजेश चौधरी यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ग्रेटर नोयडातील यमुना एक्स्प्रेसवेवर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. राजेंद्रसिंह यादव असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.