कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांचा अपमान, मृतदेह डंपरमधून नेल्याने संताप; भाजप आमदारांचा जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्लाबोल

Kishtwar News: कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह डंपरमधून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी भाजप आमदारांनी जम्मू-काश्मीर पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.
BJP MLA Blasts JK Police Over Dumper Transport Of martyred Special Cops

BJP MLA Blasts JK Police

ESakal

Updated on: 

तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन भागातून बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (SPO) मृतदेह आढळले. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळून आल्या असून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...