माझी ताकद माहित नाही का? भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या आमदाराचे नाव आहे. उदयभान चौधऱी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का? अशा शब्दांत उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

फतेहपूर-सिकरी: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असे या भाजपच्या आमदाराचे नाव आहे. उदयभान चौधऱी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का? अशा शब्दांत उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

उदयभान चौधरी फतेहपूर-सिकरीचे आमदार आहेत. आग्रा येथील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ते उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांकडे गेले होते. आमदार धमकावत असताना तिथे उपस्थित समर्थक महिला अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी करु लागले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयभान चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत माफी मागण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांनी उदयभान चौधरींनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Bjp Mla Udaybhan Chaudhary Threatens Sub Divisional Magistrate