esakal | 'भाजप कोरोनापेक्षा अधिक धोकादायक'; नुसरत जहाँ यांच्या विधानावर भाजप भडकली
sakal

बोलून बातमी शोधा

Nusrat_Jahan

नुसरत जहाँ यांच्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला आहे. भाजपचे सोशल मीडिया टीम प्रमुख अमित मालवीय यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला.

'भाजप कोरोनापेक्षा अधिक धोकादायक'; नुसरत जहाँ यांच्या विधानावर भाजप भडकली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी कोरोनापेक्षाही भाजप (Bharatiy Janata Party) अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्तेदेखील चांगलेच भडकले आहेत. 

नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदारसंघातील बशीरहाट येथे आयोजित रक्तदान शिबिरात बोलताना हे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि तृणमूलचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

'फिर मिलेंगे!'; शेतकरी आणि सरकारमधील ९वी बैठकसुद्धा निष्फळच!​

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ म्हणाल्या, "तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवले तर तुमच्याभोवती असे काही लोक आहेत, जे कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहेत. याची जाणीव होईल. कोरोनापेक्षा जर काही धोकादायक असेल, तर ते भाजप आहे. कारण त्यांना आपल्या संस्कृतीविषयी माहिती नाही, तसेच त्यांना मानवता समजत नाही. त्यांना कठोर परिश्रमांचे मूल्य कळत नाही. ते फक्त व्यवसाय करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे आणि त्यांच्याकडील सर्व संपत्ती ते उधळत सुटले आहेत. भाजप धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असून दंगली भडकवत आहे."

सरकारने 100 वेळा बोलावलं तरी जाऊ, पण कायदे रद्द झालेच पाहिजे; शेतकऱ्यांची ठाम भूमिका​

नुसरत जहाँ यांच्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला आहे. भाजपचे सोशल मीडिया टीम प्रमुख अमित मालवीय यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला. तृणमूलचे नेते तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये गुंतले आहेत. कोरोना लसीबाबत वाईट राजकारण केले जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्दीकी चौधरी यांनी लसीचा ट्रक रोखला आणि मुस्लीमबहुल डेरंगा भागात तृणमूलचे खासदार भाजपची तुलना कोरोनाशी करत आहेत. पण याबाबत ममता गप्प आहेत, असे मालवीय यांनी म्हटले आहे. 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image