esakal | भाजप खासदार बाबूल सुप्रियोंची मोठी घोषणा; राजकारणातून घेतला संन्यास!
sakal

बोलून बातमी शोधा

Babul Supriyo

भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांचा राजकारणाला 'अलविदा'

sakal_logo
By
अमित उजागरे

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार असलेले गायक बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आपली 'मन की बात' शेअर केली आहे. सामाजिक कार्यासाठी मला राजकारण सोडावं लागत आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुप्रियो फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "'गुडबाय' मी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीआय या कुठल्याही पक्षांनी मला बोलावलेलं नाही. मी कुठेही जाणार नाही. समाजकार्य करण्यासाठी मी राजकारणातून सन्यास घेत आहे. येत्या महिन्याभरात मी माझं सरकारी निवासस्थान सोडणार आहे. माझ्या खासदारपदाचाही मी राजीनामा दिला आहे." भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत पोस्ट लिहीली आहे.

हेही वाचा: शुल्कसवलतीचा निर्णय हा मोदींच्या प्रेरणेनेच : विखे पाटील

मी कायमच एका टीमचा खेळाडू राहिलो आहे. कायमचं एका टीमला सपोर्ट केला असून एकाच पक्षाला समर्थन दिलंय. मी आधीपासूनच भाजप सोडू इच्छित होतो. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी पक्षासोबत माझे काही मतभेद होते. त्या बाबी निवडणुकीपूर्वीच सर्वांच्या समोर आल्या होत्या. निवडणुकीतील पराभवाची मी जबाबदारी घेतोच पण यासाठी दुसरे नेतेही जबाबदार आहेत. आता भाजपकडं अनेक नेते आहेत. तसेच तरुण कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवत आहेत. भाजपत दाखल होण्याचा निर्णय आपण तेव्हा घेतला होता. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद नाहीच्या बरोबरच होती, असंही बाबुल सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुप्रियो यांनी काल शुक्रवारीच आपल्या फेसबुकवरुन एका मागून एक अनेक पोस्ट करत राजकारण सोडण्याचे संकेत दिले होते. यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी फेसबुकवर 'अलविदा' लिहून राजकारण सोडल्याची घोषणा केली.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं होते नाराज?

आठ जुलै रोजी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी ७ जुलै रोजी १२ मंत्र्यांनी दिला होता राजीनामा. यामध्ये बाबुल सुप्रीयो यांचाही समावेश होता. यामुळे ते नाराज असल्याचं दिसून आलं होतं. याबाबत ते अधुनमधून सोशल मीडियातून व्यक्त होत होते. पण थेटपणे काहीही बोलणं टाळत होते.

loading image
go to top