दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना गोळ्या घाला - भाजप खासदार

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

नुकतीच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मिरला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी 10, 000 अल्पवयीन मुलांवरील ज्यांनी पहिल्यांदाच दगडफेकीत सहभाग घेतला होता, त्यांच्या तक्रारी मागे घेण्याची सूचना दिली होती. यानंतरच वत्स यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.    

नवी दिल्ली : 'काश्मिरमध्ये लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना जागेवरच गोळ्या मारल्या पाहिजेत', असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार डी. पी. वत्स यांनी केले.

नुकतीच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मिरला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी 10, 000 अल्पवयीन मुलांवरील ज्यांनी पहिल्यांदाच दगडफेकीत सहभाग घेतला होता, त्यांच्या तक्रारी मागे घेण्याची सूचना दिली होती. यानंतरच वत्स यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.    

राजनाथसिंहांच्या सूचनेनंतर जम्मू-काश्मिरमधील 10, 000 अल्पवयीन मुलांवरील तक्रारी मागे घेतल्या गेल्या आहेत. या युवकांना ही चूक सुधारण्याची संधी देऊन, ज्यांनी पहिल्यांदाच दगडफेक केली आहे, त्यांना अशा घटनांतून बाहेर येण्याची व सुधारण्याची संधी दिली आहे. त्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी या तक्रारी मागे घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. 

सरकारचा हा निर्णय निराशाजनक असून लष्कराचे मनोबल कमी करणारा आहे. तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला गुन्हे मागे घेण्याबाबत ही माहिती दिली आहे.

Web Title: BJP MP DP Vats says stone pelters in Kashmir should be shot dead