भाजप खासदाराचं हेलिकॉप्टर गोल-गोल फिरतच राहिले...

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

राजस्थानच्या अलवरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. भाजपचे खासदार महंत बालकनाथ यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर वाऱ्याच्या वेगामुळे ते गोल-गोल फिरू लागले. मात्र, पायलटने समयसूचकता दाखविल्याने दुर्घटना टळली.

अलवर: राजस्थानच्या अलवरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. भाजपचे खासदार महंत बालकनाथ यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर वाऱ्याच्या वेगामुळे ते गोल-गोल फिरू लागले. मात्र, पायलटने समयसूचकता दाखविल्याने दुर्घटना टळली. हेलिकॉप्टर गोल गोल फिरत असताना हे पाहताना उपस्थितांच्या मात्र काळजाचा ठोका चुकला.

भाजपचे खासदार बालकनाथ त्यांच्या मतदारसंघातील कोट कासिम भागातील मंदिरात गेले होते. बालकनाथ यांचे कार्यकर्ते श्वास रोखून हेलिकॉप्टर गोल गोल फिरत असल्याचा प्रकार पाहत होते. वाऱ्याचा वेग पाहता दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे कार्यकर्ते श्वास रोखून हेलिकॉप्टरकडे पाहत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Mahant Balaknaths chopper loses control

टॅग्स