मोदींच्या निर्णयाला भाजप खासदाराचा विरोध!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया यांनीच मोदींच्या निर्णयाला विरोध दर्शवित घरचा आहेर दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राडदिया म्हणाले, "या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी अस्वस्थ आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये बदलून देण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळून जाईल.' तसेच 'शेतकऱ्यांनी नोटा बदलण्यासाठी कोठे जायचे? इतर सर्व बॅंकांना नोटा बदलण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र फक्त जिल्हा सहकारी बॅंकांनाच का दिले नाही?', असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले आहेत. सहकारी बॅंकांना नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने होणाऱ्या परिणामांची माहिती यापूर्वीच राडदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिली आहे.

मोदी यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच काही राजकीय पक्ष या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर मोदी यांनी लाच घेऊन हा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे.

Web Title: BJP MP: Rural economy has collapsed post note ban