

BJP MP’s ‘Pure Petrol’ Remark
Esakal
मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ विमान सेवेच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. इथेनॉल विरोधात सध्या देशभरात चर्चा होत आहे. याविरोधात आंदोलनही होत आहे. यावरच त्यांनी कार्यक्रमात केलेल्या विधानाची चर्चा आता सोशल मीडियावर होतेय. खासदार मिश्रा यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले.