esakal | हिंदू मंदिरातील पैसे अल्पसंख्यांक आणि अधर्मी लोकांकडे जातात - साध्वी प्रज्ञा ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

sadhvi pragya

साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं की, हिंदू मठ आणि मंदिरे सरकारच्या ताब्यातून काढून घ्यायला हवीत.

हिंदू मंदिरातील पैसे अल्पसंख्यांक आणि अधर्मी लोकांकडे जातात - साध्वी प्रज्ञा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मध्य प्रदेशात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतना भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं की, हिंदू मठ आणि मंदिरे सरकारच्या ताब्यातून काढून घ्यायला हवीत. मंदिर आणि मठ सरकारच्या सुरक्षेत असतात. जिल्हाधिकारी त्यांचे अध्यक्ष असतात. हिंदुंच्या मंदिरामधील पैसा, मोठ मोठ्या मंदिरांमधील पैसे हे अल्पसंख्यांकाकडे जातात, अधर्मी लोकांकडे जातात.

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, प्रयागराजमध्ये आय़ोजित कुंभ मेळ्यावेळी स्थापन करण्यात येणारा भारत भक्ती आखाडा हा मंदिरांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आंदोलन करेल. मंदिरावर असलेलं सरकारचं नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी मोहिम सुरु करणार. हिंदु स्वत: आपल्या मंदिराची देखभाल करतील, हिंदुच्या श्रद्धेचं जे धन आहे, जे लोक दान देतात ते हिंदुंच्या विकासासाठीच उपयोगी पडेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा: परंपरा अभ्यासक्रमात हव्यात : मनसुख मंडाविया

मंदिराला मिळणारा निधी हा हिंदुंच्या विकासासाठी खर्च केला गेला पाहिजे. भोपाळमध्ये आखाड्याचे कार्यालय हे धार्मिक कार्य, देशाची सुरक्षा आणि देशभक्तीचं केंद्र बनेल असंही साध्वी प्रज्ञा सिंग यांनी म्हटलं.

याआधी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी क्रूज रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख खानवर टीका केली होती. साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या होत्या की, हे तेच लोक आहेत जे भारत असुरक्षित असल्याचं म्हणतात. इथं खातात आणि मदत पाकिस्तानला करतात असंही प्रज्ञा सिंग म्हणाल्या होत्या.

loading image
go to top