Rahul Gandhi : “विदेशी महिलेच्या पोटी…”, राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi, Sonia Gandhi

Rahul Gandhi : “विदेशी महिलेच्या पोटी…”, राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान!

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावरील चर्चेत वाढ झाली आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी विरोधक यांनी देखील टीका केली. दरम्यान भाजपा खासदार संजय जैस्वाल यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त विधान केलं आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना संजय जैस्वाल म्हणाले की, विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही. एनडीटीव्हीला मुलाखत देताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. दरम्यान, संजय जैस्वाल यांच्या या व्यक्तव्यानंतर पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले संजय जैस्वाल?

जी व्यक्ती देशातील लोकशाही, न्यायालये आणि पत्रकारांना चुकीचं मानते, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही. खरं विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही. हेच दोन हजार वर्षांपूर्वी चाणाक्यनेही सांगितलं होतं. राहुल गांधींना बघितल्यानंतर त्यांच्या शब्दांची आठवण होते, असं भाजपा खासदार संजय जैस्वाल यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरूनही राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना मोदींना चोर म्हणून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती. न्यायालयातही ते माफी मागू शकले असते, मात्र, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी माफी मागितली नाही, असंही संजय जैस्वाल पुढे म्हणालेत.