सनी देओल यांची खासदारकी होणार रद्द?

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

- 86 लाखांचा केला प्रचारात खर्च

नवी दिल्ली : भाजपचे नवनियुक्त खासदार अभिनेते सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. सनी देओल यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे. 

पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल विजयी झाले आहेत. मात्र, आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा उमेदवारासाठी प्रचारात 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, सनी देओल यांनी प्रचाराच्या खर्चासाठी दिलेली मर्यादा पाळली नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

86 लाखांचा केला प्रचारात खर्च

सनी देओल यांनी निवडणुकीच्या प्रचारात 86 लाख रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सनी देओल यांच्याकडे खर्चाचा तपशील मागितला आहे. 

...तर होऊ शकते खासदारकी रद्द

लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारीने 70 लाखांहून अधिक खर्च केल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित खासदाराचे सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sunny Deol to get EC notice for overspending during campaign may lose seat