केजरीवाल सर्वात मोठे यू-टर्न नेते; भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांची टीका

Arvind Kejriwal and Tejswi Surya
Arvind Kejriwal and Tejswi Surya

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तेजस्वी सूर्या यांनी शनिवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना देशातील "सर्वात मोठे यू-टर्न" नेते असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच गुजरातचे तरुण केजरीवाल यांच्या त्यांचे "रेवडी आणि बेवडी राजकारणाला धुडकावून लावतील, असंही ते सूर्या म्हणाले. (tejashwi surya news in Marathi)

Arvind Kejriwal and Tejswi Surya
Video : पैसे भाजपचे काम 'आप' चे; मोदींच्या गुजरातममध्ये केजरीवालांचा कानमंत्र

भारतीय जनता युवा मार्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांनी केजरीवाल यांना यांना राजकारणात विश्वासार्हता नसल्याचा दावा केला. राजकोट शहरात केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर सूर्या म्हणाले की, दिल्लीतील चांगल्या शाळा, मोहल्ला दवाखाने आणि स्वच्छ राजकारणाचे आप नेत्याचे दावे भाजपने उघड केले आहेत. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआयचा छापा आपच्या राजकारणाचा शेवट असल्याचंही सूर्या यांनी म्हटलं.

Arvind Kejriwal and Tejswi Surya
पोरांची मज्जा! विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळा

ते म्हणाले की, गुजरातने स्वच्छ, उत्तरदायी आणि पारदर्शक कारभार पाहिला आहे ज्यामुळे राज्यातील वंचित आणि गरीबांसाठी समृद्धी आणि प्रगती सुनिश्चित झाली आहे. सूर्या म्हणाले, "जगातील भारत ही एकमेव अर्थव्यवस्था आहे ज्याने जीडीपीमध्ये 13 टक्के वाढ केली आहे. मोदी किती सक्षमपणे (पंतप्रधान नरेंद्र) देशाचे नेतृत्व करत आहेत, याचेच ते द्योतक आहे. नरेंद्र मोदींसारखा नेता देशाला दिल्याबद्दल मी भारताच्या जनतेच्या वतीने गुजरातचे आभार मानतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com