संघ प्रचारक ते उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या तीरथ सिंह रावत यांच्याविषयी

Tirath Singh Rawat
Tirath Singh Rawat

नवी दिल्ली- भाजप खासदार तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. मंगळवारी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उत्तराखंडचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाते. भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.  तीरथ सिंह रावत आज 4 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी राज्यपाल बेबी नानी मौर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता भाजप कार्यालयाने तीरथ सिंह रावत यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. यासंबंधी झालेल्या बैठकीत भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. 

कोण आहेत तीरथ सिंह रावत?

तीरथ सिंह रावत फेब्रुवारी 2013 ते डिसेंबर 2015 पर्यंत उत्तराखंड भाजप प्रदेश अध्यक्ष होते. ते चौबट्टाखालमधून आमदार 2012-2017)  राहिले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि गढवाल लोकसभेतून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना हिमाचल प्रदेशचा प्रभारीही बनवण्यात आलं होतं. 2000 मध्ये स्थापन झालेल्या उत्तराखंडचे ते पहिले शिक्षामंत्री होते. 2012 मध्ये ते चौबट्टाखाल विधानसभा मतदारासंघातून निवडले गेले. 2013 मध्ये त्यांच्याकडे उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षची जबाबदारी आली. 

आरएसएसचे प्रचारक होते तीरथ

तीरथ सिंह 1983 ते 1988 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (उत्तराखंड) संघटन मंत्री आणि राष्ट्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी असल्यापासूनच झाली होती. ते विद्यार्थी संघ मोर्चाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चाचे (उत्तर प्रदेश) प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राहिले आहेत. 1997 मध्ये ते उत्तर प्रदेश विधान परिषदचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत 2,85,003 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com