esakal | चीनला समुद्रात शह देणार भारतीय नौदल; अणू शक्तीवर चालणाऱ्या 6 पाणबुड्यांच्या प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

submarine

समुद्रात चीनची वाढती ताकद आणि त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारताने देखील आपली बाजू भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.

चीनला समुद्रात शह देणार भारतीय नौदल; अणू शक्तीवर चालणाऱ्या 6 पाणबुड्यांच्या प्लॅन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : समुद्रात चीनची वाढती ताकद आणि त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारताने देखील आपली बाजू भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या नौसेनेची ताकद वाढवण्यासाठी भारताने सहा अणू शक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा समावेश नौसेनेमध्ये करण्याच्या योजनेवर गतीने काम सुरु केलं आहे. 8 मार्च रोजी DRDO ने मुंबईमध्ये एअर इंडिपेंडेंट प्रोपेल्शन टेकनिकचं परिक्षण केलं आहे. यामुळे 6 न्यूक्लियर पॉवर अटॅक सबमरीनची योजना प्रत्यक्षात अवतरणार आहे.

हे परिक्षण म्हणजे भारताचं एक मोठं पाऊल मानलं जात आहे. कारण या टेकनिकमुळे भारतीय पाणबुड्या समुद्रातील कामगिरीमध्ये आणखीनच ताकदवान तसेच घातक होतील. एअर इंडिपेंडेंट प्रोपेल्शन टेकनिक पाणबुडीला पाण्याच्या आत अधिक काळासाठी राहण्यासाठी मदत करतो आणि एक अणू पाणबुडीच्या तुलनेत शांतपणे सब-सरफेसच्या  प्लॅटफॉर्मवर आणखीनच घातकपणे हल्ले करण्याची क्षमता यामुळे प्राप्त होते. याचाच अर्थ असा की, शत्रुच्या उपस्थितीत देखील त्याला चकवा देत त्याच्यावर घातक हल्ला करण्याची क्षमता या पाणबुड्यांना प्राप्त होणार आहे. 

हेही वाचा - जगातील एक तृतीयांश महिला करतात शारीरिक, लैंगिक हिंसेचा सामना; WHO चा अभ्यास

कलवरी क्लासची तिसरी पाणबुडी INS करंज आज म्हणजेच 10 मार्च रोजी भारतीय नौसेनेमध्ये समाविष्ट होणार आहे. आता या AIP टेकनिकला कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी जोडलं जाईल. भारतीय नौसेनेने आता आपल्या सगळ्याच कलवरी क्लासच्या अटॅकना एअर इंडिपेंडेंट प्रोपेल्शनमध्ये बदलण्याची योजना बनवली आहे. 2023 पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल, असं म्हटलं जातंय. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चीनच्या नौसेनेला कडवी टक्कर देण्यासाठी आता भारत तयार होतोय. भारताच्या या पावलामुळे चीनशी दोन हात करण्याची भारताची ताकद वाढणार आहे. 
 

loading image
go to top