भाजप खासदार मला पाहून मागे जातात : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नवी दिल्ली: राजकीय विरोधकांशी लढण्याची रणनीति बनविताना कुणाचा द्वेष करण्याची गरज नाही. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी असहमत असू शकतो, त्यांचा विरोध करू शकतो, भांडू शकतो पण त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. हा, मी त्यांना मिठी जरुर मारू शकतो. असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यक्त केले. लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या भाषणानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी राहुल गांधी बोलत होते. 

पुढे मजेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, आजकाल भारतीय जनता पक्षाचे खासदार मला पाहून दोन पाऊले मागे जातात बहुतेक ते असा विचार करत असतील की, मी त्यांना मिठी मारेल.  

प्रसिद्ध लेखक करन थापर यांच्या पुस्तक प्रकाशना सोहळ्यानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राहुल गांधी यांच्यासह माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवणी, करण सिंह, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे सरचिटनीस सिताराम येचुरी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, करण सिंह यांनी आपल्या देशा विषयी सांगताना धर्माच्या संदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टा मला द्वेष करायला सांगत नाहीत. सिताराम येचुरी यांच्याशी मी लढू शकेल पण त्यांचा द्वेष नाही करणार. पण भाजपचे लोकांना असा का विचार करतात हे मला समजत नाही.

Web Title: BJP MPs look back at me: Rahul Gandhi