शिवसेनेला राज्यसभा उपसभापतिपदाची 'ऑफर' ?

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतिपदाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांच्या पदाचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने राज्यसभेचे उपसभापती हे पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतिपदाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. 

parliament

राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी. जे. कुरियन काही महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. राज्यसभेचे उपसभापतिपद गेल्या ४१ वर्षांपासून काँग्रेसकडे आहे. आता मोदी सरकारकडून याबाबत विचार केला जात असून, हे पद प्रमुख विरोधी पक्षांकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या 'ऑफर'वर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेला दिलेली ही 'ऑफर' स्वीकारली नाहीतर भाजपकडून भूपेंद्र यादव यांच्या नावावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: BJP offers Shivsena to Deputy Speaker post Political News