Election: भाजपचं ऑपरेशन लोटस! 3 लाख मुस्लीम कार्यकर्त्यांना सोबत घेत आखणार रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election: भाजपचं ऑपरेशन लोटस! 3 लाख मुस्लीम कार्यकर्त्यांना सोबत घेत आखणार रणनिती

Election: भाजपचं ऑपरेशन लोटस! 3 लाख मुस्लीम कार्यकर्त्यांना सोबत घेत आखणार रणनिती

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची जोरदार तयारी आतापासूनच सुरू केलीय. सेक्यूलर पक्षांच्या प्रचाराला तगड उत्तर देण्यासाठी भाजपने आता रणनिती आखली आहे. भाजपकडून 3 लाख मुस्लिम कार्यकर्त्यांना भाजप विशेष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाच्यामार्फत भाजप आपल्या कार्यकर्त्यांना तयार करत आहे.

भाजपविषयी अपप्रचार कऱणाऱ्या पक्षांना उत्तर देण्यासाठी प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना विशेष धडे दिले जाणार आहेत. भाजप राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा: HP Election : 4 टर्म आमदार असलेल्या उमेदवाराऐवजी भाजपनं चहावाल्याला दिली उमेदवारी

देशातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक मुस्लिम कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील 12 हजार अल्पसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे, याबाबतची माहिती जमाल सिद्धीकी यांनी दिली.

भाजप पक्ष मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे मुस्लिम कार्यकर्ते यातून उत्तर देतील. कार्यकर्त्यांना अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी तयार करण्याचे प्रमुख उद्दीष्ट या प्रशिक्षणातून साध्य करण्याचा प्रयत्न असेल, असंही सिद्धीकी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: शिंदे-फडणवीस-राज ठाकरे भेटीवर रुपाली पाटील यांची टीका; म्हणाल्या छुप्या...